खालापूरात भंगार गोडाऊनला आग
खालापुरात भंगार गोडाऊनला आग
खालापूर, ता. १६ (बातमीदार) : खालापूर तालुक्यात याक शाळेजवळील रफिक राजपूत यांच्या भंगार गोडाऊनला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कच्चा माल असल्याने आग झपाट्याने पसरली. दुपारी साडेतीनच्या सुमारास लागलेली आग संध्याकाळी सातपर्यंत पूर्णपणे आटोक्यात आली नव्हती. खोपोली नगर परिषद, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू व रिलायन्सच्या अग्निशमन दलांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

