डम्परच्या धडकेत
डिलिव्हरी बॉयचा मृ्त्यू

डम्परच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृ्त्यू

Published on

डम्परच्या धडकेत
डिलिव्हरी बॉयचा मृ्त्यू
मुंबई, ता. १६ ः भरधाव डम्परने दिलेल्या धडकेत एका २८ वर्षीय डिलिव्हरी बॉयचा अपघाती मृत्यू झाला. ही घटना दहिसर येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर सोमवारी दुपारी घडल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. समीर शेख असे मृत डिलिव्हरी बॉयचे नाव असून, तो अंधेरीच्या जुहू गल्ली परिसरात वास्तव्यास होता. दहिसर चेक नाका परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गावरून जाताना समीरच्या दुचाकीला भरधाव डम्परने पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यात समीरचा मृत्यू झाला. घटनेनंतर डम्परचालक अकबर पठाण (वय ४३) हा घटनास्थळावरून पसार झाला. मात्र, पाठलाग करून त्यास अटक केल्याचे दहिसर पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com