वसई ते श्री क्षेत्र शिर्डी पालखी मिरवणूक

वसई ते श्री क्षेत्र शिर्डी पालखी मिरवणूक

Published on

वसई ते शिर्डी पालखीस सुरुवात

वसई, ता. १७ (बातमीदार) : श्री साई मित्रमंडळ व शिवछाया मित्रमंडळ, नवयुगनगर, दिवाणमान वसई (प.) आयोजित रामनवमी महोत्सवानिमित्त साईबाबांच्या पादुकांची मिरवणूक सोमवारी (ता. १६) श्री साई मंदिर, पापडी येथून सुरू झाली आहे. या वेळी साईभक्त संदेश जाधव व पुष्पा जाधव यांनी पालखीची विधिवत पूजा केली आणि स्थायी समितीचे सभापती प्रवीण शेट्टी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवत मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.
पालखीत कोळीवाडा, पापडी, माणिकपूर परिसरातील महिला, पुरुष आणि तरुण असे २०० साईभक्त सहभागी झाले आहेत. संदेश जाधव, दिनेश पवार, मिलिंद जाधव, कल्पना गंभीरे, अजय हल्या, हरिश्चंद्र पाटील, अविनाश ठाकूर, जयश्री गोमा, विलास डोंगरे यांनी या पालखीचे आयोजन केले आहे. तसेच या पालखी सोहळ्यासाठी माजी महापौर नारायण मानकर, माजी उपमहापौर प्रकाश रॉड्रिग्ज, नगरसेवक कल्पेश मानकर, प्रमिला पाटील, मार्शलीन चाको, सुवर्णा पाटील, कांती मानकर, प्रशांत जाधव उपस्थित होते.
--------
वसई : शिर्डीसाठी निघालेल्या पालखीत अनेक साईभक्त सहभागी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com