विराज प्रोफाईल्स प्रकल्पासाठी ८ एप्रिलला जनसुनावणी

विराज प्रोफाईल्स प्रकल्पासाठी ८ एप्रिलला जनसुनावणी

Published on

विराज प्रोफाइल्स प्रकल्पासाठी ८ एप्रिलला जनसुनावणी


बोईसर, ता. १७ (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील मे. विराज प्रोफाइल्स प्रा. लि. यांच्या प्रस्तावित विस्तारीकरण प्रकल्पासाठी पर्यावरणविषयक जाहीर जनसुनावणी ८ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. मान गावातील एस.आर.एम. युनिट परिसरात, हत्ती गेटजवळ ही सुनावणी जिल्हाधिकारी पालघर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.

कंपनीने मान व वारांगडे गावातील विविध सर्व्हे क्रमांकांवर हॉट रोल्ड स्टेनलेस स्टील उत्पादन प्रकल्पाच्या नियमितीकरणासोबतच मोठ्या प्रमाणावर विस्तारीकरणाचा प्रस्ताव सादर केला आहे. या अंतर्गत विद्यमान उत्पादन क्षमता १,९५,८४० टन प्रति वर्षावरून २,७६,००० टन प्रति वर्ष इतकी वाढविण्याचा तसेच HRAP/CRAP शीट्स, प्लेट्स व कॉइल्सचे उत्पादन २० लाख टन प्रति वर्ष करण्याचा प्रस्ताव आहे.

पर्यावरण आघात मूल्यांकन अधिनियम २००६ (सुधारित अधिसूचना १ डिसेंबर २००९) नुसार अशा प्रकल्पांसाठी जनसुनावणी घेणे बंधनकारक असल्याने ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून या सुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रकल्पाचा पर्यावरण आघात मूल्यांकन (EIA) अहवाल व कार्यकारी सारांश (मराठी व इंग्रजी) संबंधित शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांच्या पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून, नागरिकांनी आपली मते, हरकती व सूचना जनसुनावणीदरम्यान मांडाव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com