व्यावसायिक ‘गॅस’ वितरणाबाबत जव्हारमध्ये नाराजी

व्यावसायिक ‘गॅस’ वितरणाबाबत जव्हारमध्ये नाराजी

Published on

व्यावसायिक ‘गॅस’ वितरणाबाबत जव्हारमध्ये नाराजी
आमच्यावरच निर्बंध का? हॉटेल व्यावसायिकांचा सवाल

जव्हार, ता. १७ (बातमीदार) : महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या वितरणाबाबत अलीकडे घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जव्हार तालुक्यातील हॉटेल व खाणावळ व्यावसायिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. गॅस सिलिंडरच्या पुरवठ्याला प्राधान्यक्रम ठरविण्यात आल्याने हॉटेल व्यवसायावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
जव्हार शहर व परिसरात अनेक लहान-मोठी हॉटेल, खाणावळी, ढाबे तसेच केटरिंग व्यवसाय सुरू आहेत. या सर्व व्यवसायांचा मुख्य आधार एलपीजी गॅसवर असल्याने पुरेशा प्रमाणात सिलिंडर उपलब्ध न झाल्यास व्यवसाय चालविणे कठीण होत असल्याची तक्रार व्यावसायिकांनी केली आहे. घरगुती वापरासाठी गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत सुरू असताना व्यावसायिकांना मात्र मर्यादित सिलिंडर मिळत असल्याने अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर जव्हारमधील हॉटेल, रेस्टॉरंट व केटरिंग व्यावसायिकांची बैठक घेण्यात आली. बैठकीत शासनाने व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा नियमित व पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली अन्यथा आगामी काळात व्यवसाय टिकविणे कठीण होईल, अशी चिंता व्यक्त करण्यात आली. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन हॉटेल व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.
-------------
शासनाने काढलेल्या परिपत्रकात व्यावसायिक सिलिंडर वितरणात हॉटेल, मिठाईची दुकाने, केटरर्स यांना प्राधान्य क्षेत्रातून वगळण्यात आल्यामुळे खाद्य व्यवसाय संकटात आला आहे. तरी शासनाने प्राधान्य यादीत हॉटेल, रेस्टॉरंट, स्वीट मार्ट, केटरर्स यांना काही प्रमाणात का असेना समाविष्ट करून न्याय द्यावा.
- राकेश भोये, हॉटेलचालक
------------------
सध्या लग्नसराईची लगबग असून, अनेक लग्नाच्या ऑर्डर व्यावसायिकांकडे प्रलंबित आहेत. अशावेळी सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे व्यवसायासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. तरी शासनाने त्वरित व्यावसायिक सिलिंडर उपलब्ध करून दिलासा द्यावा.
- वैभव अभ्यंकर, केटरिंग व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com