राष्ट्रीय लोक अदालतीत एकाच दिवसात ८३,४२४ प्रकरणांचा निपटारा

राष्ट्रीय लोक अदालतीत एकाच दिवसात ८३,४२४ प्रकरणांचा निपटारा

Published on

लोकअदालतीत ठाणे अव्वल
एकाच दिवसात ८३,४२४ प्रकरणांचा निपटारा; १८७ कोटींहून अधिक रकमेची तडजोड
ठाणे शहर, ता. १७ (बातमीदार) ः ठाणे जिल्हा विधानसभा प्राधिकरणाच्या माध्यमातून आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत न्यायालयात दाखल पूर्व आणि प्रलंबित ८३ हजार ४२४ प्रकरणांचा निपटारा झाला आहे. सलग चौथ्यांदा राज्यात प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान ठाणे जिल्ह्याला मिळाला आहे.
राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून लाखो प्रलंबित प्रकरणे निकाली काढून न्यायालयाच्या मोठा भार कमी केला जात आहे. ठाणे जिल्ह्यातदेखील वर्षातून चार वेळा अशा प्रकारची लोक अदालत भरवली जाते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली चालू वर्षातील पहिली लोकअदालत शनिवारी (ता. १४) ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये आयोजित केली होती. या माध्यमातून एकाच दिवसात प्रलंबित २८ हजार ८३३ आणि दाखल पूर्व ५४ हजार ५९१ असा एकूण ८३ हजार ४२४ प्रकरणांचा निकाल लावला आहे. यामधून एक अब्ज ८७ कोटी ५० लाख ९३ हजार ३२६ एवढ्या रकमेची तडजोड करून भरपाई दिली आहे.

दावा प्रकरणे तडजोड
मोटार अपघात ३३२ ३५,२६,८८,९१८
डी आर टी प्रकरणे १०० ५१,५२,५०,०८१
धनादेश प्रकरण १६०४ २८,३३,२३,०६५

न्यायालयीन वाद कायमस्वरूपी व जलद निकाली काढण्यासाठी लोकअदालत व मध्यस्थी प्रक्रिया पद्धत सर्वात प्रभावी माध्यम आहे. या माध्यमातून वाद कायमस्वरूपी व जलद गतीने मिटला जातो. वेळेची व पैशांची बचत होते.
- न्या. रवींद्र एस. पाजणकर सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com