मुंबई
गुढीपाडवा निमित्त प्रभादेवीत शोभायात्रा
गुढीपाडव्यानिमित्त प्रभादेवीत शोभायात्रा
प्रभादेवी, ता. १७ : नववर्षाच्या औचित्याने गुढीपाडव्याच्या दिवशी प्रभादेवीत पारंपरिक वेषभूषेत लेझीम आणि ढोल-ताशांच्या गजरात सामाजिकतेचा संदेश देणारी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
प्रभादेवीकर हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रा समितीच्या वतीने ही शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. प्रभादेवी परिसरातून ती मार्गक्रमण करणार आहे.
या वेळी नागरिकांसाठी मराठी वाद्यवृंदाचा विशेष कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. तसेच प्रभादेवी परिसरातील रेल्वे स्थानक, मंदिर आदी विषयांवर रील स्पर्धा घेण्यात येणार असून उत्कृष्ट वेशभूषेसाठी पारितोषिक देण्यात येणार असल्याची माहिती समितीचे कृष्णा पाटील यांनी दिली.

