एलिफंटा बेटावर  प्लास्टिकची लाट,

एलिफंटा बेटावर प्लास्टिकची लाट,

Published on

एलिफंटा बेटावर २.५ टन कचरा गोळा
जागतिक वारसास्थळाला प्रदूषणाचा विळखा; मच्छीमार, वन विभाग आणि स्वयंसेवकांची संयुक्त स्वच्छता मोहीम

उरण, ता. १७ (बातमीदार) ः जागतिक वारसास्थळ असलेल्या एलिफंटा (घारापुरी) बेटाच्या किनाऱ्याला सागरी प्रदूषणाचा प्रचंड मोठा धोका निर्माण झाला आहे. रविवारी (ता. १५) राबवण्यात आलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेत किनारपट्टीवरून तब्बल २.५ टनांहून अधिक कचरा गोळा करण्यात आला. या मोहिमेमुळे सागरी प्रदूषणाची पातळी किती गंभीर झाली आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
ही मोहीम वनशक्ती या पर्यावरण संस्थेच्या किनारपट्टी विभाग सागरशक्ती यांच्या पुढाकाराने राबवण्यात आली. यामध्ये महाराष्ट्र वन विभागाच्या मॅन्ग्रोव्ह कक्षाचे अधिकारी, न्हावा, गव्हाण, दिवाळे कोळीवाडा आणि आसपासच्या किनारी गावांतील परंपरिक मच्छीमार संघटनांचे सदस्य सहभागी झाले. या उपक्रमात ६० हून अधिक स्वयंसेवक, स्थानिक मच्छीमार आणि वन विभागाचे अधिकारी सहभागी झाले. केवळ ५०० मीटर किनारपट्टीची स्वच्छता करताना प्लॅस्टिक, टाकाऊ मासेमारी साहित्य आणि इतर सागरी कचऱ्यासह २.५ टनांपेक्षा अधिक कचरा गोळा करण्यात आला.
एलिफंटा बेटासारख्या जागतिक वारसास्थळालाही समुद्री प्रदूषणाचा वाढता फटका बसत असल्याचे या मोहिमेतून दिसून आले आहे. त्यामुळे कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करणे आणि स्थानिक समुदायाच्या सहभागातून किनारी परिसंस्था जपणे अत्यावश्यक असल्याचे या वेळी नमूद करण्यात आले.

किनारी पर्यावरणाचे आरोग्य महत्त्वाचे
नॅटकनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले, की मुंबई परिसरातील विविध ठिकाणी मॅन्ग्रोव्ह स्वच्छता मोहिमांमध्ये स्वयंसेवकांना टनावारी प्लॅस्टिक, चपला, वैद्यकीय कचरा आणि अगदी गाद्याही आढळत आहेत. त्यांनी एका बाजूला अधिक कडक देखरेख आणि दुसऱ्या बाजूला लोकांमध्ये जनजागृती वाढवण्याची गरज व्यक्त केली, जेणेकरून सागरी आणि किनारी पर्यावरणाचे आरोग्य टिकवता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com