रोह्यातील नंदकुमार तेलंगे केंद्र प्रमुख स्पर्धा परीक्षेत राज्यात तिसरे

रोह्यातील नंदकुमार तेलंगे केंद्र प्रमुख स्पर्धा परीक्षेत राज्यात तिसरे

Published on

रोह्यातील नंदकुमार तेलंगे केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षेत राज्यात तिसरे
रोहा, ता. १७ (बातमीदार) : रोहा तालुक्यातील जि. परिषद (पीएमश्री) केंद्र शाळा कोलाड येथे कार्यरत असणारे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक नंदकुमार अविनाश तेलंगे यांनी समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेत २०० पैकी १६९ गुण प्राप्त करून रायगड जिल्ह्यात प्रथम, तर राज्यात तृतीय क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. ही परीक्षा ३ जानेवारीला घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल शनिवारी (ता. १४) जाहीर करण्यात आला आहे.
या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातून ४६,०६८ जणांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरले होते. यापैकी ३८, ५५८ जणांनी परीक्षा दिली. नंदकुमार तेलंगे हे हेटवणेसारख्या खेडेगावातील असून, सध्या ते कोलाड केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com