जुईनगर परिसरात पोलीस गस्त वाढीची मागणी

जुईनगर परिसरात पोलीस गस्त वाढीची मागणी

Published on

जुईनगर परिसरात पोलिस गस्त वाढीची मागणी
जुईनगर, ता. १९ (बातमीदार) : परिसरात रात्री वाढणारी वर्दळ, संशयास्पद हालचाली आणि नागरिकांमध्ये निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना याकडे ठाकरे गटाच्या युवासेना पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. सुरक्षेसंदर्भात नागरिकांच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर युवासेना पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय कांबळे यांची भेट घेऊन परिसरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चर्चा केली.
या बैठकीत जुईनगर परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित विविध मुद्दे उपस्थित करण्यात आले. संवेदनशील ठिकाणी पोलिसांची उपस्थिती व गस्त वाढविणे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. अजय कांबळे यांनी यावर प्रतिसाद देताना, नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक सर्व उपाययोजना केल्या जातील तसेच नियमित गस्त वाढविण्यावर भर दिला जाईल, असे सांगितले. नागरिकांनी संशयास्पद घटना त्वरित पोलिसांना कळवाव्यात व आपत्कालीन परिस्थितीत ११२ क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही केले. या बैठकीत अविनाश भालसिंग व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com