गुढीपाडव्यानिमित्त वसई-विरारमध्ये शोभायात्रेची लगबग

गुढीपाडव्यानिमित्त वसई-विरारमध्ये शोभायात्रेची लगबग

Published on

विरार, ता. १७ (बातमीदार) : अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गुढी पाडव्याची लगबग वसई-विरारमध्ये सुरू झाली आहे. मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी वसई-विरार शहरात ठिकठिकाणी शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यात पारंपरिक साहसी खेळांसह ‘इंधन स्वावलंबनाचा’ संदेश देणारे आधुनिक सोलार वाहन आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. त्याशिवाय महिलांची बाइक रॅली आणि विविध स्पर्धा हे आकर्षण असणार आहे.

नायगावमधील स्वराज्य रणरागिणी महिला मंडळाच्या संकल्पनेतून गेल्या दोन वर्षांपासून नायगावचा पाडवा साजरा केला जातो. यामध्ये मुख्य आकर्षण असते ते म्हणजे महिलांची बाइक रॅली. या शोभा यात्रेची सुरुवात सनटेक मॅक्स वर्ल्ड येथून होणार आहे. ग्लोबल अरेना-नक्षत्र ओझोन-बालाजी हॉटेल-छत्रपती शिवाजी महाराज चौक -नवकार फेज १, २- डॉन बॉस्को शाळा-साईधाम-रखा दादा मंदिर येथे समाप्त होणार आहे.

विरारमधील श्री विठ्ठलनाथ संस्थानतर्फे गेल्या २३ वर्षांपासून स्वागत यात्रेचे आयोजन केले जाते. ‘आमची वसई’ संस्थेतर्फे काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेत यंदा पारंपरिकतेसह आधुनिकतेची सांगड पाहायला मिळेल. वसईतील पंचवटी नाका ते वसई किल्ला या मार्गावर निघणाऱ्या यात्रेत वर्तक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले सोलार वाहन विशेष लक्ष वेधून घेईल. सध्याच्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर इंधन स्वावलंबन आणि पर्यावरणपूरक ऊर्जा असा मोलाचा संदेश दिला जाईल. ‘वसईचा राजा’ अंतर्गत सकाळी साडेआठ वाजता रेमेडी येथील श्री दत्तमंदिर येथून या यात्रेला सुरुवात होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com