तापमान पारा वाढताच प्रशासन दक्ष
वसई, ता. १७ (बातमीदार) : वाढत्या उन्हामुळे तापमानाचा पारा वाढू लागला असल्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. तापमान ३२ अंशावर पोहोचले असून, उष्माघातापासून बचाव करण्यासाठी वसई-विरार महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. उन्हाळ्यात नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
उन्हाची झळ बसत असल्याने सर्वसामान्य नागरिक घामाघूम होऊ लागले आहेत. प्रवास करताना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. डोळे, चेहरा, हाताला चटके जाणवू लागले आहेत. त्यामुळे टोपी, गॉगल, मास्कचा वापर केला जात आहे. दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत उन्हाची झळ अधिक जास्त असते. विविध ठिकाणी रस्त्याशेजारी शीतपेयांची दुकाने मांडू लागली आहेत. ज्येष्ठ, लहान मुले, महिला, वाहनचालक थंड पेयांच्या गाडीवर गर्दी करू लागले आहेत. थंडगार सरबत, फळांचा बाजार खुलला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून प्रवास करताना उष्णतेची झळ सोसावी लागत आहे.
सद्यःस्थितीत वसई-विरार शहर महापालिका कार्यक्षेत्रात तापमानात वाढ झाली आहे. उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी नागरिकांनी कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत महापालकेच्या आरोग्य विभागाने यादी जाहीर करत नागरिकांना सतर्क केले आहे.
शहाळे महागले
शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहावे, यासाठी शहाळे, थंड पेयाकडे नागरिकांचा कल अधिक दिसून येत आहे. सध्या बाजारात शहाळे ७० ते ८० रुपयांना विक्री केली जात आहे, तर सरबत, उसाचा रस २० रुपये प्रति ग्लास मिळत आहे. अंगाची लाही घालवण्यासाठी नागरिक दुकानांबाहेर गर्दी करत आहेत.
दही, ताकाला मागणी वाढली
उन्हाळ्यात मागणी अधिक असल्याने अनेक दुकानांत ताक, दही लवकर संपू लागले आहे. शरीराचा दाह कमी करण्यासाठी उपयुक्त असल्याने गर्दी दिसून येत आहे.
पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करा
उन्हाळा सुरू असल्याने पशु-पक्ष्यांना पाण्याची कमतरता जाणवू नये, म्हणून नागरिकांनी त्यांना पाणी द्यावे, यासाठी आपल्या घराजवळ किंवा सार्वजनिक ठिकाणी पाण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन पक्षीप्रेमी करू लागले आहेत.
काय करावे?
- पुरेसे पाणी प्या. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.
- ओरल रिहाइड्रेशन सोल्यूशन (ओआरएस) वापरा.
- लिंबू पाणी, ताक, लस्सी फळांचे रस यांसारखे घरगुती पेय प्यावे.
- टरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबीर, हंगामी भाज्या खाव्यात.
- पातळ, सैल, सुती हलक्या रंगाचे कपडे घालावेत.
- छत्री, टोपी, टॉवेलचा वापर करावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

