सानपाड्यात कांशीराम यांची ९२ वी जयंती उत्साहात साजरी

सानपाड्यात कांशीराम यांची ९२ वी जयंती उत्साहात साजरी

Published on

सानपाड्यात कांशीराम यांची जयंती उत्साहात
नवी मुंबई (वार्ताहर) : बामसेफ तसेच बहुजन समाज पार्टीचे संस्थापक तथा बहुजन चळवळीचे प्रेरणास्थान कांशीराम यांच्या ९२व्या जयंतीनिमित्त रविवारी (ता. १५) सानपाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता भवन येथे कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुरेश माने होते, तर प्रमुख वक्ते म्हणून ओबीसी महासंघाचे अध्यक्ष ॲड. प्रदीप ढोबळे आणि ॲड. दिनेश राजभर उपस्थित होते.
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड. नवीन प्रतापे यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात बहुजन साहित्य-कला अकादमीचे गायक नीलेश गायकवाड यांच्या प्रेरणादायी गीतांनी झाली. या कार्यक्रमात सुरेश केदारे, ॲड. चैतन्य कांबळे, एस. आर. सिंग आणि बीआरएसपी पक्षाच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com