कोपरखैरणेत दिवसाढवळ्या सोनसाखळी लूटली

कोपरखैरणेत दिवसाढवळ्या सोनसाखळी लूटली

Published on

कोपरखैरणेत भररस्त्यात सोनसाखळी चोरी
नवी मुंबई (वार्ताहर) : कोपरखैरणे परिसरात भररस्त्यात एका व्यक्तीच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी (ता. १६) सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास तक्रारदार रामदास पवार (वय ५९) सेक्टर १५ मधील रोशनी सोसायटीसमोर रस्त्यावर उभे राहून फोनवर बोलत होते. या वेळी एका दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी पाठीमागून येऊन पवार यांच्या गळ्यातील सुमारे दोन लाख ३० हजार रुपये किमतीची सोनसाखळी खेचून पसार झाले. यामध्ये पवार यांच्या मानेला दुखापत झाली आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com