बोरघर हवेली येथे राजस्व अभियानांतर्गत नागरिकांना विविध लाभांचे वाटप
बोरघर हवेली येथे राजस्व अभियानांतर्गत नागरिकांना विविध लाभांचे वाटप
तळा, ता. १७ (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत बोरघर हवेली येथे नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार तसेच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार हे अभियान राबविण्यात आले.
१८ फेब्रुवारी ते ५ मार्चदरम्यान तळा तालुक्यात गावागावांत जनजागृती करून अर्ज स्वीकारण्यात आले. १४ मार्च रोजी सोनसडे मंडळांतर्गत बोरघर हवेली येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले. या वेळी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी चित्रफितीद्वारे मार्गदर्शन केले.
शिबिरात २ उत्पन्न, १८ अधिवास, ११ जातीचे व ४ नॉनक्रीमीलेयर दाखल्यांचे वाटप करण्यात आले. तसेच १९७ नागरिकांना डिजिटल ७/१२, ६२ जणांना ८अ देण्यात आले. आधार नोंदणी, फेरफार निकाली काढणे व संजय गांधी योजनेचे लाभही देण्यात आले. पंचायत समितीमार्फत घरकुल प्रमाणपत्रे, पशुवैद्यकीय व महिला बालकल्याण विभागाच्या योजनांचा लाभ देण्यात आला.
या प्रसंगी नथुराम मुकण (सभापती), रविंद्र मांडवकर (उपसभापती), अक्षरा कदम (पंचायत समिती सदस्य), स्वाती पाटील (तहसीलदार), सुनील गायकवाड (सहाय्यक गटविकास अधिकारी), मंगेश पलांडे (नायब तहसीलदार), धर्मराज पाटील (नायब तहसीलदार), दीपाली शेळके (सीडीपीओ) यांसह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

