निळज येथे श्री वाकडाई माता मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात
निळज येथे श्री वाकडाई माता मंदिराचा वर्धापनदिन उत्साहात
माणगाव, ता. १७ (वार्ताहर) : माणगाव तालुक्यातील निळज येथे श्री वाकडाई माता मंदिरचा प्रथम वर्धापनदिन सोमवारी (ता. १६) उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या वेळी सकाळपासून मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. वर्धापनदिनानिमित्त देवीचा अभिषेक सोहळा तसेच श्रीसत्यनारायण महापूजा घेण्यात आली. त्यानंतर महाआरती व तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले.
दुपारी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संध्याकाळी पार पडलेल्या पालखी सोहळ्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पालखी नाचवत खालू बाजाच्या तालावर लेझीमचा ठेका धरत ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. महिला, तरुण व लहान मुलांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.
रात्री आयोजित भजन कार्यक्रमामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. निळज, धरणाची वाडी, बौद्धवाडी व आदिवासीवाडी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ - निळज येथे श्री वाकडाई माता मंदिराचा प्रथम वर्धापनदिन मोठ्या आनंदात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

