मुरबाडमध्ये घरगुती गॅस काळाबाजारावर करडी नजर

मुरबाडमध्ये घरगुती गॅस काळाबाजारावर करडी नजर

Published on

मुरबाड, ता. १७ (वार्ताहर) : इंधन दरवाढ व संभाव्य तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर मुरबाड तहसील प्रशासनाने घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि काळाबाजार रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. या अनुषंगाने तहसीलदार अभिजित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय दक्षता पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
घरगुती गॅसचा अवैध व व्यावसायिक वापर; तसेच साठेबाजी रोखण्यासाठी पुरवठा निरीक्षण अधिकारी संयोगिता पवार, पुरवठा निरीक्षक संदीप थोरात आणि इतर कर्मचाऱ्यांनी संयुक्त कारवाई सुरू केली आहे. १२ मार्चला गॅस एजन्सींची तपासणी करण्यात आली, तर १३ मार्चला गजानन गॅस एजन्सीसह इतर ठिकाणी गोदामामधील सिलिंडर साठ्याची पाहणी करण्यात आली. तसेच मुरबाडमधील काही हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये अचानक छापे टाकून घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर होत आहे का, याची तपासणी करण्यात आली. गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश तहसीलदार देशमुख यांनी दिले आहेत. दरम्यान, तालुक्यात सध्या गॅसचा कोणताही तुटवडा नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पुरवठा निरीक्षण अधिकारी संयोगिता पवार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com