प्रकल्पग्रस्तांचा सिडको विरोधात निषेध आंदोलन

प्रकल्पग्रस्तांचा सिडको विरोधात निषेध आंदोलन

Published on

प्रकल्पग्रस्तांचा सिडकोविरोधात निषेध आंदोलन
तुर्भे, ता. १७ (बातमीदार) : सिडकोच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून एमआयडीसी व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीने मंगळवारी (ता. १७) काळा दिवस पाळत सिडको भवनसमोर जोरदार निदर्शने केली. प्रलंबित प्रश्न सुटण्याऐवजी आता सिडकोने प्रकल्पग्रस्तांच्या घरांवरच कारवाईच्या नोटिसा बजावल्याने हा लढा आता न्यायालयात नेण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील आणि कामगार नेते ॲड. सुरेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त महिला व पुरुष सहभागी झाले होते.
नवी मुंबई प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने संपादित करण्यात आल्या. मात्र अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळ उलटूनही अनेक शेतकऱ्यांना पुनर्वसनाचे भूखंड मिळालेले नाहीत. उलट आता सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने एमआरटीपी कायद्यांतर्गत ५०० हून अधिक प्रकल्पग्रस्तांना नोटीस बजावून त्यांची घरे बेकायदा ठरवली आहेत. यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत दोन्ही संघटनांच्या शिष्टमंडळाने सिडको प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र समाधानकारक चर्चा न झाल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी असून, लवकरच न्यायालयीन लढा लढणार असल्याचे मनोहर पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com