महासभेत नागरिकांच्या मुलभूत प्रश्नांकडेही गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे : वल्ली राजन

महासभेत नागरिकांच्या मुलभूत प्रश्नांकडेही गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे : वल्ली राजन

Published on

प्राण्यांसोबतच नागरिकांच्या प्रश्नांकडेही लक्ष द्या
सामाजिक कार्यकर्ते वल्ली राजन यांचे आवाहन
कल्याण, ता. १७ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महासभेत भटक्या श्वानांच्या निर्बीजीकरणातील अनियमितता, स्वतंत्र हॉस्पिटल आणि प्राण्यांची स्मशानभूमी यांसारख्या विषयांवर नुकतीच सविस्तर चर्चा झाली. दरम्यान, प्राण्यांच्या विषयाइतकेच महत्त्व शहरातील नागरिकांच्या ज्वलंत आणि मूलभूत समस्यांनाही दिले जावे, असे मत सामाजिक कार्यकर्ते वल्ली राजन यांनी व्यक्त केले.

वल्ली राजन यांनी निदर्शनास आणून दिले, की कल्याण-डोंबिवलीतील नागरिक आजही अनेक मूलभूत समस्यांशी झुंजत आहेत. यामध्ये प्रामुख्याने दर्जेदार सरकारी रुग्णालयांची कमतरता आहे. पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था आणि रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे यामुळे अपघाताची भीती आहे. वाढती कोंडी, पदपथांवरील अतिक्रमणे आणि अपुरी सिग्नल व्यवस्था आहे. तसेच शहरात सातत्याने प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे.

लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा
महासभेत विविध विषयांवर चर्चा होणे हे लोकशाहीचे लक्षण आहे. मात्र नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित प्रश्नांवर अधिक लक्ष केंद्रित होणे गरजेचे आहे. जनतेने नगरसेवक आणि प्रशासनावर विश्वास ठेवला त्याला सार्थ ठरवत मूलभूत सोयीसुविधांना प्राधान्य दिले जावे, असेही राजन यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com