मंदा म्हात्रे यांना हृदयविकाराचा झटका

मंदा म्हात्रे यांना हृदयविकाराचा झटका

Published on

मंदा म्हात्रे यांना हृदयविकाराचा झटका

पहाटे तातडीने शस्त्रक्रिया; प्रकृती स्थिर

नवी मुंबई, ता. १७ : बेलापूरच्या आमदार आणि नवी मुंबई भाजपच्या ज्येष्ठ नेत्या मंदा म्हात्रे यांना मंगळवारी पहाटे हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तातडीने बेलापूरमधील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्वरित शस्त्रक्रिया करून त्यांच्या हृदयात दोन स्टेंट बसवले असून, त्यांची प्रकृती चांगली असल्याचे त्यांचे पुत्र नीलेश म्हात्रे यांनी सांगितले.

मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास छातीत वेदना आणि अस्वस्थता जाणवताच कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात नेले. तिथे प्राथमिक तपासणीनंतर हृदयविकाराचा झटका असल्याचे स्पष्ट झाले. सक्रिय आणि लढाऊ नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हात्रे यांच्या प्रकृतीच्या बातमीने समर्थकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली. भाजपसह सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्याशी संवाद साधून प्रकृतीची चौकशी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com