पेट कॉर्नर दुर्लक्षित

पेट कॉर्नर दुर्लक्षित

Published on

पेट कॉर्नर दुर्लक्षित
श्वानांचा सार्वजनिक ठिकाणी वाढता उपद्रव

नेरूळ, ता. १७ (बातमीदार) : शहरातील विविध भागांत उभारण्यात आलेल्या ‘पेट कॉर्नर’ संकल्पनेची योग्य देखभाल होत नसल्याचे चित्र समोर आले आहे. महापालिकेने पाळीव प्राण्यांना फिरविण्यासाठी व त्यांच्या गरजा भागविण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली असली, तरी अनेक ठिकाणी अस्वच्छता वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
पेट कॉर्नरमध्ये नियमित स्वच्छता न झाल्यामुळे दुर्गंधी पसरत असून परिसरात अस्वच्छतेचे प्रमाण वाढले आहे. काही पाळीव श्वानांना सार्वजनिक ठिकाणी फिरवले जात असून त्यांच्या विष्ठेमुळे रस्ते व मोकळ्या जागा अस्वच्छ होत आहेत. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने पाळीव प्राण्यांना फिरवताना स्वच्छतेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच पेट कॉर्नरची नियमित साफसफाई करण्याबरोबरच नागरिकांनीही जबाबदारीने वर्तन करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, भटक्या श्वानांची वाढती संख्या हीदेखील चिंतेचा विषय ठरत असून प्रशासनाने योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com