पारंपरिक जीवनशैलीचा संदेश देणारी ‘गुढी’
पारंपरिक जीवनशैलीचा संदेश देणारी ‘गुढी’
बालमित्र मंडळाचा अनोखा देखावा
ठाणे, ता. १७ (बातमीदार): हिंदू नववर्षाचा प्रारंभ मानल्या जाणाऱ्या गुढीपाडवानिमित्त ठाण्यातील बालमित्र मंडळ यंदा पारंपरिक जीवनशैलीचा वेध घेणारा अनोखा देखावा सादर करणार आहे. आताच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये गॅसवरून लोक चुलीकडे वळले आहेत. हा धागा पकडत ‘तंत्रज्ञान थांबले, तरी परंपरा उभी राहते’ हा मध्यवर्ती विचार या माध्यमातून केला जाणार आहे.
बाल मित्र मंडळ गेली १२ वर्षे विभागातील सर्व नागरिकांना एकत्र घेऊन सार्वजनिक गुढी उभारत असते. जनतेसाठी मेहनत करणाऱ्या असंख्य हातांना हा गुढी उभारण्याचा मान दिला जातो. आजपर्यंत सफाई कर्मचारी, तृतीय पंथी, शिक्षक, जेष्ठ नागरिक असे अनेक जनतेच्या खऱ्या मानकऱ्यांकडून या गुढीचा सन्मान वाढविण्यात आला आहे. नवीन वर्षानिमित्त विभागात दिवसभर असंख्य कार्यक्रमंची रेलचेल असते. हा कार्यक्रम श्रीनगर, वागळे इस्टेट विभागातील जुने व प्रसिद्ध मंडळ बाल मित्र मंडळचे समीर सावंत व नैनेश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली राबवत असते.
आजच्या वेगवान आणि तंत्रज्ञानाधारित जीवनशैलीत अनेक सुविधा सहज उपलब्ध असल्या, तरी एखाद्या संकटाच्या वेळी माणूस पुन्हा परंपरेकडे वळतो, हे वास्तव मांडण्याचा प्रयत्न यंदाच्या गुढीपाडव्याला केला जाणार आहे. अलीकडेच गॅस टंचाईमुळे काही ठिकाणी पारंपरिक चुली पुन्हा पेटल्या, हे उदाहरण यासाठी ठळकपणे पुढे आणले जाणार आहे. देखाव्यात पारंपरिक चूल, जुनी जीवनपद्धती, स्वयंपाकाच्या पद्धती यांसह ग्रामीण जीवनशैलीचे वास्तवदर्शी चित्रण केले जाणार आहे. या पारंपरिक गुढी उभारणी आणि देखाव्याचा अनुभव घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बालमित्र मंडळाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

