“आमदार चषक 2026” क्रिकेट स्पर्धा उत्साहात

“आमदार चषक 2026” क्रिकेट स्पर्धा उत्साहात

Published on

‘आमदार चषक २०२६’ क्रिकेट स्पर्धा उत्साहात
तुर्भेतील कै. गणपतशेठ तांडेल मैदानावर रंगल्या चुरशीच्या लढती
तुर्भे, ता. १७ (बातमीदार) : कै. गणपतशेठ तांडेल मैदानावर सुरू असलेली ‘आमदार चषक २०२६’ क्रिकेट स्पर्धा मोठ्या जल्लोषात पार पडली. दुसऱ्या दिवशीही स्थानिक क्रीडाप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मैदानावर दिवसभर उत्साहाचे वातावरण होते.
दिवसभर झालेल्या सामन्यांमध्ये विविध संघांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. फलंदाजांनी आकर्षक फटकेबाजी करत धावांचा वर्षाव केला, तर गोलंदाजांनी अचूक मारा करत प्रतिस्पर्ध्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे अनेक रोमांचक क्षण निर्माण झाले.
या स्पर्धेत करावे ११ विरुद्ध सीवूड्स ११, स्पर्श ११ बेलापूर विरुद्ध जय बजरंगबळी दिवाळे, सानपाडा विरुद्ध श्री कृष्ण स्टार वाशी गाव तसेच कै. कांता स्मृती करावे विरुद्ध ए.पी. बॉईज नेरूळ यांच्यात सामने रंगले.
या वेळी मंदा म्हात्रे यांच्यासह पोलिस पाटील दिलीप पाटील, पुण्यनाथ तांडेल, अश्विन पाटील, योगेश तांडेल, मिलिंद भोईर, विरचंद्र तांडेल, गुरुनाथ तांडेल, शिवम तांडेल, विरसेन तांडेल, मिलिंद कडू आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com