नवी मुंबईत विविध ठिकाणी हिंदू नववर्ष शोभायात्रांचे आयोजन
नवी मुंबईत विविध ठिकाणी हिंदू नववर्ष शोभायात्रांचे आयोजन
सानपाडा, नेरूळ, सीवूड्स व वाशी येथे उत्साहात तयारी
तुर्भे, ता. १७ (बातमीदार) : नवी मुंबईत हिंदू नववर्षानिमित्त विविध ठिकाणी शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले असून, शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सानपाडा येथील अखिल सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने १९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता सेक्टर-८ येथील श्री गणेश मंदिरातून शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. विविध चौकांमधून मार्गक्रमण करत हुतात्मा बाबू गेणू मैदान येथे समारोप होईल. या यात्रेत छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या वेशभूषा, वारकरी दिंडी, लेझीम व ढोल पथक सहभागी होणार आहेत.
नेरूळमध्ये मातृभूमी प्रतिष्ठान व सकल हिंदू समाजाच्या वतीने सायंकाळी ४.३० वाजता स्वा. सावरकर चौकातून शोभायात्रा निघणार असून, दुर्गामाता मंदिर येथे समारोपानंतर महाआरती होणार आहे. सीवूड्स येथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथून शोभायात्रा प्रारंभ होऊन विविध मार्गाने फिरून सेक्टर-४२ येथे समारोप होईल.
वाशी येथेही हिंदू नववर्ष स्वागतयात्रा समितीच्या वतीने सेक्टर-१८ मधून शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

