अखंडित विजेसाठी टाटा पावर सज्ज
अखंडित विजेसाठी टाटा पॉवर सज्ज
उन्हाळ्यात वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर व्यापक तयारी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर विजेच्या मागणीत झपाट्याने वाढ होत आहे. त्याची दखल घेत टाटा पाॅवरने मुंबईतील आपल्या नेटवर्कवर असलेल्या सुमारे आठ लाख ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करता यावा, म्हणून विशेष तयारी केली आहे. वीज ग्राहकांना विजेचा तुटवडा जाणवू नये, म्हणून वीजनिर्मिती, पारेषण आणि वितरण नेटवर्कमध्ये व्यापक तयारी करण्यात आली आहे.
टाटा पॉवरने वीज ग्रीडची स्थिरता कायम राखण्यासाठी, कमाल वीज मागणीचे कार्यक्षम व्यवस्थापन करण्यासाठी कंपनीकडून विविध ऑपरेशनल, तांत्रिक आणि ग्राहक-केंद्रित उपाययोजना राबवल्या जात आहेत. मुंबई शहर आणि उपनगरातील सुमारे आठ लाखांहून अधिक ग्राहकांना टाटा पाॅवरकडून वीजपुरवठा केला जात आहे. वाढत्या तापमानामुळे पंखे, वातानुकूलित यंत्र यांचा वापर वाढत असल्याने टाटाच्या नेटवर्कवरील विजेची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्याची दखल घेत टाटा पाॅवरने वीज वापराच्या पद्धतींचे विश्लेषण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशीन लर्निंग (एमएल) तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यामध्ये एप्रिल ते जून २०२६ दरम्यान त्यांच्या मुंबई वितरण क्षेत्रात विजेची सर्वाधिक मागणी सुमारे १,१५० मेगावॉटपर्यंत पोहोचू शकते, असे अनुमान काढण्यात आले आहे. त्यामुळे अखंडित वीजपुरवठ्यासाठी सर्व करारबद्ध वीज उत्पादन युनिट्सना पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
देखभाल पूर्ण
कमाल वीज मागणीच्या कालावधीत उपकरणे पूर्णपणे सज्ज राहावीत, यासाठी उत्पादन यंत्रणांमध्ये प्रतिबंधात्मक देखभाल पूर्ण करण्यात आली आहे. त्याचबरोबर संभाव्य अडचणींची पूर्वकल्पना मिळावी, यासाठी टाटा पॉवरकडून ट्रान्स्फॉर्मर, फीडर पिलर्स आणि भूमिगत केबल नेटवर्कचे थर्मल स्कॅनिंग केले जात आहे. त्यामुळे मुंबईत टाटाकडून विजेच्या मागणीत वाढ झाल्यानंतरही अखंडित वीजपुरवठा होऊ शकणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

