भटक्या श्वानांसाठी हक्काचे निवारागृह
भटक्या श्वानांसाठी हक्काचे घर
पालिकेकडून अर्थसंकल्पात पाच कोटींची तरतूद
प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. १८ : वसई-विरार शहरात भटक्या श्वानांचा वावर वाढला आहे. त्यामुळे पालिकेने श्वानांच्या निवारागृहासाठी अर्थसंकल्पात पाच कोटींची तरतूद केली असून नागरिकांची सुरक्षा, प्राण्यांचे रक्षण अशी दुहेरी सांगड घातली आहे.
वसई-विरार शहरात सार्वजनिक ठिकाणी, वर्दळीच्या मार्गावर, भाजी मंडई, गृहसंकुलांमध्ये भटक्या श्वानांचा वावर वाढला आहे. अनेकदा लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला, वाहनचालकांना दंश करतात. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेत पालिकेकडून श्वानांवरील आजारांवर उपचार तसेच एकाच ठिकाणी राहण्याची व्यवस्था डॉग शेल्टरमध्ये केली जाणार आहे. याअंतर्गत निवारा, अन्न-पाणी व्यवस्था, वैद्यकीय तपासणी, लसीकरण तसेच नसबंदी सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. यामुळे भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात ठेवणे शक्य होणार आहे.
-------------------------------------
श्वानप्रेमींना हातभार
वसई येथे श्वानप्रेमींनी स्वःखर्चाने श्वानांच्या राहण्याची तात्पुरती व्यवस्था केली होती. जवळपास १० ते १२ शेल्टरमध्ये श्वानांच्या राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था केली गेली आहे. या उपक्रमाचा पावसाळ्यात चांगला फायदा झाला होता.
----------------------
वसई-विरार शहरातील नागरिकांची सुरक्षा, भटक्या श्वानांना आसरा मिळावा, यासाठी निवारा केंद्र उभारण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद केली असून वैद्यकीय सेवा, निवारा, अन्न-पाणी व्यवस्था होणार आहे.
- मनोजकुमार सूर्यवंशी, आयुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

