मोटरमनच्या कुटुंबाला एक कोटीचा धनादेश
मोटरमनच्या कुटुंबाला एक कोटीचा धनादेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागातील वरिष्ठ मोटरमनच्या कुटुंबाला स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (एसबीआय) एक कोटी रुपयांचा विमा धनादेश देण्यात आला. सुधारित रेल्वे सॅलरी पॅकेज (आरएसपी) योजनेअंतर्गत मुंबई सेंट्रल विभागात दिला गेलेला हा पहिलाच विमा दावा असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.
मुंबई सेंट्रल विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज सिंह आणि एसबीआयच्या मुंबई मेट्रो सर्कलच्या मुख्य महाव्यवस्थापक मंजू शर्मा यांनी १६ मार्चला आयोजित कार्यक्रमात मृत कर्मचाऱ्यांच्या पत्नीला एक कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. या वेळी रेल्वे आणि एसबीआयचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. भारतीय रेल्वे आणि एसबीआय यांच्यात सप्टेंबर २०२५मध्ये रेल्वे सॅलरी पॅकेज योजनेसाठी सामंजस्य करार करण्यात आला होता. या योजनेअंतर्गत हा दिलासा देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

