३५ हजारांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी ताब्यात
३५ हजारांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी ताब्यात
कासा, ता. १७ (बातमीदार) : येथील गंजाड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आंबेसरी उपकेंद्रातील भरारी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय माणिक सांगळे यांना ३५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता. १७) रंगेहाथ पकडले.
गणेशबाग (गंजाड) येथील संदीप बाबू दळवी (वय ४०, व्यवसाय- चालक) यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. तक्रारदार आणि त्यांच्या दोन मित्रांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नागद्वारी, जामशेत आणि आंबेसरी येथे इको गाड्या भाडेतत्त्वावर दिल्या होत्या. या गाड्यांच्या बिलांची रक्कम मंजूर करून देण्यासाठी डॉ. सांगळे यांनी मोबदल्याच्या नावाखाली दरमहा १० हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे. मार्च २०२५ ते ऑगस्ट २०२५ या सहा महिन्यांच्या बिलांनंतरही पुढील रक्कम मंजूर करण्यासाठी आरोपीने प्रत्येकी ३० हजार रुपये तसेच पाच हजार रुपये डिपॉझिट अशी एकूण ३५ हजार रुपयांची मागणी केली होती. तिघांकडून मिळून एकूण एक लाख पाच हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. पडताळणीत लाचेची मागणी स्पष्ट झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यानुसार आशागड चौक ते जामशेत मार्गावरील एका टपरीशेजारी पंचांच्या उपस्थितीत डॉ. सांगळे यांना ३५ हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी डहाणू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

