आधारवाडी कारागृहाबाहेर आतषबाजी; तिघे अटकेत

आधारवाडी कारागृहाबाहेर आतषबाजी; तिघे अटकेत

Published on

आधारवाडी कारागृहाबाहेर आतषबाजी; तिघे अटकेत

डोंबिवली, ता. १७ : कल्याण पश्चिमेतील आधारवाडी कारागृहाबाहेर उच्च दाब विद्युत कुंपणाजवळ फटाक्यांची आतषबाजी करीत कैद्याचा वाढदिवस साजरा करणाऱ्या तिघा तरुणांना खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सतीश मार्तंड कांबळे ऊर्फ सत्या हा विविध गुन्ह्यांप्रकरणी कारागृहात न्यायबंद आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त समर्थकांनी ‘हॅप्पी बर्थडे’च्या घोषणांसह ४४० व्होल्ट उच्चदाब कुंपणाखाली फटाके उडवले. या प्रकाराचा व्हिडिओही समाजमाध्यमांवर व्हायरल झाला.

कारागृह कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता संबंधितांनी धक्काबुक्की करून पळ काढला. सीसीटीव्हीच्या आधारे रोहित जगदाळे, क्षितिज भगत आणि आकाश खडसे यांना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com