ठाण्यात शोरूममध्ये इलेक्ट्रिक कारला आग

ठाण्यात शोरूममध्ये इलेक्ट्रिक कारला आग

Published on

शोरूममधील इलेक्ट्रिक कारला भीषण आग

ठाणे, ता. १८ ः वागळे इस्टेट येथील एका प्रसिद्ध शोरूममध्ये बुधवारी (ता. १८) सकाळी विक्रीसाठी ठेवलेल्या इलेक्ट्रिक चारचाकी कारला अचानक आग लागली. या आगीत कार पूर्णतः खाक झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बुधवारी सकाळी ८.१५ वाजता, श्रीनगर, रोड क्रमांक २७, आशार कंपाउंड, वागळे इस्टेट येथे ही घटना घडली. शोरूममधील नवी कोरी इलेक्ट्रिक कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

आग लागल्याचे समजताच दीपक जयस्वाल यांनी प्रशासनाला पाचारण केले. त्यानंतर अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी आणि शोरूमच्या कर्मचाऱ्यांनी मिळून आगीवर नियंत्रण मिळवले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक रेस्क्यू वाहन आणि एक फायर इंजिन घटनास्थळी तैनात करण्यात आले होते. इलेक्ट्रिक कारला आग कशामुळे लागली, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्टसर्किट की बॅटरीमधील बिघाड, याचा तपास सध्या सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात काहीकाळ भीतीचे वातावरण होते. या घटनेमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, बॅटरी व्यवस्थापनावर लक्ष देण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com