‘पालिका मुख्यालयात आरोग्यसुविधेचा अभाव’

‘पालिका मुख्यालयात आरोग्यसुविधेचा अभाव’

Published on

‘पालिका मुख्यालयात आरोग्य सुविधेचा अभाव’
विरार (बातमीदार) ः वसई-विरार शहर पालिकेच्या मुख्य कार्यालयात दररोज शेकडो नागरिक, कर्मचारी येत असतात. या सर्वांच्या आरोग्याची सुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून मुख्यालयात ‘आपला दवाखाना’ किंवा ‘आयुष्मान केंद्र’ सुरू करण्यात यावे, तसेच एक बेसिक लाइफ सपोर्ट दर्जाची रुग्णवाहिका तैनात ठेवावी, अशी मागणी आरोग्य मित्र राजेंद्र ढगे यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. पालिकेच्या मुख्य कार्यालयात अंदाजे ४०० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच, विविध कामांनिमित्त दररोज १०० ते २०० नागरिक या कार्यालयाला भेट देत असतात. एवढ्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित असताना एखाद्या व्यक्तीची प्रकृती अचानक बिघडल्यास किंवा आपत्कालीन वैद्यकीय गरज भासल्यास तिथे तातडीची उपचार यंत्रणा असणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com