नारिंगी पुलाचे काम पूर्णत्वाकडे

नारिंगी पुलाचे काम पूर्णत्वाकडे

Published on

नारिंगी पुलाचे काम पूर्णत्वाकडे
महापौर अजीव पाटील यांच्याकडून पाहणी
विरार, ता. १८ (बातमीदार)ः विरार पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या नारिंगी पुलाचे काम ९२ टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाले आहे. केवळ किरकोळ कामे शिल्लक असून, तातडीने हा पूल सुरू करण्याच्या अनुषंगाने महापालिकेकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
विरार पूर्व, पश्चिम भागांना जोडणारा महत्त्वाचा दळणवळण मार्ग असलेल्या नारिंगी पुलाच्या कामाची महापौर अजीव पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांसोबत कामाची सद्य:स्थिती, प्रगती व गुणवत्तेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या वेळी कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याची तपासणी, तांत्रिक निकषांचे काटेकोर पालन व नियमित निरीक्षण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना राबवण्यावरही भर देण्यास सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com