गॅस टंचाईवर पालिकेत खलबते

गॅस टंचाईवर पालिकेत खलबते

Published on

गॅसटंचाईवर पालिकेत खलबते
पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महापौरांचे निर्देश
विरार, ता. १८ (बातमीदार)ः वसई-विरार पालिकेच्या कार्यक्षेत्रातील घरगुती, व्यावसायिक गॅसटंचाईच्या पार्श्वभूमीवर महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत अखंड गॅसपुरवठा करण्यासाठी समन्वयाने कार्य करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे व दीपक सावंत, स्थायी समिती अध्यक्ष प्रवीणजी शेट्टी, सभागृह नेते प्रफुल्ल साने, विरोधी पक्षनेते मनोज पाटील, ज्येष्ठ नेते नारायणजी मानकर व जितूभाई शाह उपस्थित होते, तर प्रशासनाच्या वतीने प्रांत अधिकारी शेखर घाडगे, पोलिस उपायुक्त श्रीमती पौर्णिमा चौगुले (परिमंडळ २), पोलिस उपायुक्त सुहास बाचवे (परिमंडळ ३), वसई तहसीलदार दीपक गायकवाड, पुरवठा अधिकारी, तसेच विविध गॅस कंपन्यांचे वितरक (भारत गॅस, एच.पी. गॅस, गुजरात गॅस, इंडेन गॅस), गॅस वितरक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी बैठकीत नागरिकांना भेडसावणाऱ्या गॅसटंचाईच्या समस्येवर सखोल चर्चा करण्यात आली. तसेच वितरणातील अडचणी, पुरवठ्यातील अनियमितता, वितरण साखळीतील विलंब याबाबतचा आढावा घेण्यात आला.
------------------------
काळाबाजारावर नजर
घरगुती, व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी नियोजनबद्ध वितरण, तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम करणे आणि नियमित आढावा घेणे यावर विशेष भर देण्यात आला. तसेच काळाबाजार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Marathi News Esakal
www.esakal.com