कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर

कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर

Published on

कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर
तारापूर एमआयडीसीमध्ये यंत्रणांचा अभाव
बोईसर, ता. १८ (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक वसाहतीत दुर्घटना घडल्यास कोणतीही पूर्वसूचना मिळत नसल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे वांरवांर दिसून आले आहे. अनेक कारखान्यांनी मूलभूत सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष केल्याने असे प्रकार वांरवार घडत आहेत.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखान्यांमध्ये धोक्याची घंटा (अलार्म) देणारी यंत्रणा नसल्याचे गंभीर वास्तव समोर आले असून, अलीकडील दुर्घटनांदरम्यान अलार्मच्या अभावामुळे कामगारांमध्ये मोठी धावाधाव व गोंधळ उडाल्याची बाब पुढे आली आहे. परिणामी, आपत्कालीन परिस्थितीत वेळेत इशारा न मिळाल्याने अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला. तज्ज्ञांच्या मते, प्रभावी अलार्म प्रणाली औद्योगिक सुरक्षेची पहिली गरज असून, तिच्या अभावामुळे छोट्या दुर्घटनाही मोठ्या आपत्तीमध्ये रूपांतरित होण्याचा धोका असतो. तसेच माहितीफलक नसल्याने अग्निशमन दलालाही योग्य माहिती मिळण्यात अडचणी येतात. त्यामुळे औद्योगिक सुरक्षेच्या नियमांच्या उल्लंघनाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com