जव्हार, मोखाड्यात घामाच्या धारा
जव्हार, मोखाड्यात घामाच्या धारा
महावितरणच्या उपकेंद्रात तांत्रिक बिघाड, नागरिकांना त्रास
मोखाडा, ता. १८ (बातमीदार)ः जव्हार, मोखाड्यात काही दिवसांपासून विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. वेगवेगळ्या उपकेंद्रात तांत्रिक बिघाड होत असल्याने इंटरनेट, मोबाईल तसेच शीतपेयांच्या दुकानांना झळ बसल्याने ऐन उन्हाळ्यात घामाच्या धारा लागल्या आहेत.
जव्हार, मोखाडा दोन्ही तालुक्यांना डहाणूच्या महावितरण केंद्रातून विद्युतपुरवठा होतो. या केंद्रातून सूर्यानगर, गंजाड उपकेंद्रातून जव्हार, मोखाड्यात विद्युतपुरवठा होतो. मोखाड्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास १२० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो आहे. मात्र, पंधरा दिवसांपासून डहाणू, सूर्यानगर, गंजाड, जव्हार, मोखाडातील उपकेंद्रात वारंवार तांत्रिक बिघाडाच्या घटना घडत आहेत. त्यामुळे दिवसभरात २ ते ५ तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने कमी दाबाने वीजपुरवठा होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या उपकेंद्रात कुठेही तांत्रिक बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती महावितरणकडून समाजमाध्यमातून देण्याची तत्परता अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून दाखवली जाते. मात्र, बिघाड दुरुस्त करण्याबाबत महाविरण अपयशी ठरत असल्याचा आरोप वीजग्राहकांकडून केला जात होत आहे.
-------------------------------------------
सणासुदीच्या उत्साहावर पाणी
- मोखाडा तसेच जव्हारमध्ये ३५ हजारांहून अधिक वीजग्राहक आहेत. सततच्या विजेचा लपंडाव तसेच कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. ऐन उन्हाळ्यात विजेवर चालणारे सर्व व्यवसाय ठप्प होत आहेत. त्यामुळे आर्थिक नुकसान होत असल्याने संतापाची भावना आहे. - मुस्लिम धर्मीयांचे रमजाननिमित्त उपवास सुरू आहेत, तर हिंदू धर्मीयांची नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू आहे. अशातच डहाणू-गंजाड येथील विजेच्या तांत्रिक बिघाडामुळे जव्हार-मोखाडा परिसर अंधारात असल्याने सणासुदीच्या उत्साहावर पाणी फेरले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

