मुलुंडमध्ये इफ्तार पार्टीतून सामाजिक ऐक्याचा संदेश

मुलुंडमध्ये इफ्तार पार्टीतून सामाजिक ऐक्याचा संदेश

Published on

मुलुंडमध्ये इफ्तार पार्टीतून सामाजिक ऐक्याचा संदेश
मुलुंड, ता. १८ (बातमीदार) : मुलुंड पश्चिमेतील आर. के. चॅरिटेबल ट्रस्ट आणि हमीदिया मस्जिद ट्रस्ट यांच्या वतीने मंगळवारी (ता. १७) इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांसह मुलुंड पोलिसांनीही सहभाग नोंदवला.
कार्यक्रमासाठी फैसल कादरी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. अष्टविनायक मित्र मंडळ आणि पंचशील सेवा संघ यांनीही आयोजनात सहकार्य केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जिल्हाप्रमुख अमित पाटील, शिवसेनेचे माजी उपविभागप्रमुख सुनील गारे, आरपीआयचे तालुका अध्यक्ष विनोद जाधव, मनसेचे शाखाप्रमुख महादेव देठे, राष्ट्रवादीचे वॉर्ड अध्यक्ष संतोष शर्मा तसेच मुलुंड पोलीस ठाण्याचे अधिकारी महेंद्र पोळ आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला गेला, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली.

Marathi News Esakal
www.esakal.com