रोहा तालुक्यातील गोवे येथे मोफत नेत्र तपासणी

रोहा तालुक्यातील गोवे येथे मोफत नेत्र तपासणी

Published on

रोहा तालुक्यातील गोवे येथे मोफत नेत्रतपासणी
शिबिरात ११० जणांची नेत्रतपासणी, तर १५ जणांवर होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया
रोहा, ता. १८ ( बातमीदार) ः राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट, पनवेल यांच्या वतीने रोहा तालुक्यातील गोवे गावात रविवारी (ता. १५) मोफत नेत्रतपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ११० रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली, तर १५ जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार आहे. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्या निधी नरेंद्र जाधव यांच्याकडून ७० जणांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात रोहा पंचायत समितीचे नवनिर्वाचित उपसभापती संजय मांडळुस्कर यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी जि. प. सदस्या निधी जाधव, विभागीय अध्यक्ष नरेंद्र जाधव, गोवे ग्रा. पं. उपसरपंच निशा जवके, सदस्य नरेंद्र पवार, नितीन जाधव, रंजिता जाधव, युवा कार्यकर्ते गणेश वाचकवडे, डॉ. कृष्णा नलावडे, नेत्र सल्लगार सपना पाटील, विपुल झावरे, जितेश ठाकूर, रायगड भोई समाज जिल्हा अध्यक्ष राजेश शिर्के, गोवे गाव कमेटी अध्यक्ष बळीराम जाधव, सचिव श्रीधर गुजर, भरत जाधव, नामदेव जाधव, पांडुरंग जाधव, महेंद्र जाधव, पोलिस पाटील सुरेश जाधव तसेच असंख्य ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

फोटो कॅप्शन : आदिती तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित नेत्रतपासणी शिबिरात नेत्रतपासणी करताना वैद्यकीय अधिकारी व मान्यवर.

Marathi News Esakal
www.esakal.com