डहाणू-तलासरीकरांना मनस्ताप
डहाणू-तलासरीकरांना मनस्ताप
महामार्गाशी जोडण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना साकडे
पालघर, ता. १८ ः पालघर जिल्ह्यातील डहाणू-तलासरी भागातील आदिवासीबहुल गावांना राष्ट्रीय महामार्गाशी थेट दळणवळणाचे साधन नाही. अस्तित्वात असलेले रस्ते वळसे घेऊन जावे लागत असल्याने वेळ, इंधनाचा अपव्यय होत आहे. त्यामुळे ही गावे जोडण्यासाठी नवीन रस्ता विकसित करण्याची मागणी खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
डहाणू, तलासरी तालुक्यातील बोर्डी, घोलवड, कोसबाड, रामपूर, भिनारी, जांबूगाव, झाई, जलवाई, आसवली, खुणवडे, नागबंध, नंगणकस, डोंगरीपाडा (डहाणू), परसपाडा आणि डोंगरीपाडा (तलासरी) यांसारख्या अनेक आदिवासी गावांना राष्ट्रीय महामार्गाची थेट जोडणी नाही. या गावांतील नागरिकांना राष्ट्रीय महामार्गावर पोहोचण्यासाठी चारोटीच्या दिशेने तब्बल ४२ किलोमीटर, उत्तरेकडे तलासरीकडे ४२ किलोमीटर किंवा गुजरातच्या भिलाडकडे ४८ किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागतो. यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे अस्वाली (घाट मार्गातून उत्तरेकडील वळणासह) ते करजगाव (पाटीलपाडा)- धामणगाव- सवणे- वडवलीमार्गे अस्वाली ते करजगाव (पाटीलपाडा)दरम्यान आणि धामणगाव ते वडवलीदरम्यान नवीन मार्ग विकसित करण्याची मागणी केली आहे.
-----------------------------
नवीन मार्गाचे फायदे
बडोदा- मुंबई एक्स्प्रेसवे अंदाजे १३ किलोमीटर अंतरावर, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग अंदाजे १८ किलोमीटर अंतरावर येईल. त्यामुळे वेळ, इंधन दोन्ही वाचेल. पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचे व्यापक जनहित, विकासाची गरज लक्षात घेऊन, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने या प्रस्तावाची तातडीने दखल घ्यावी. तसेच रस्त्याच्या विकासासाठी संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश द्यावेत, अशी विनंती केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

