ट्रकमधील डिझेल चोरणारा अटकेत
उल्हासनगर (वार्ताहर) : उल्हासनगरमध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकमधून डिझेल चोरी करणाऱ्या चोरट्याला विठ्ठलवाडी पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक करत चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत १३० लिटर डिझेल चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. भागवत देवरे (वय ४८) यांनी याबाबत विठ्ठलवाडी पोलिसांत तक्रार दाखल केली. देवरे हे चालक असून, त्यांनी १४ मार्चला ट्रक बाबा प्राईमजवळील बिस्किट कंपनीसमोर सार्वजनिक रस्त्यावर उभी केली होती. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने टँकमधील सुमारे १३० लिटर डिझेल चोरी केल्याचे लक्षात आले. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान नीलेश नावाच्या तरुणाला अटक करण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बी. आर. दराडे करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

