श्रीरामरक्षा पठण स्पर्धेचे आयोजन
डोंबिवलीत श्रीरामरक्षा पठण स्पर्धेचा जागर
टिळकनगर गणेशोत्सव मंडळाचा उपक्रम
डोंबिवली, ता. १८ : रामनवमीच्या पवित्र पर्वावर आपली संस्कृती आणि स्तोत्र परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पुढाकार घेतला आहे. शहरात श्रीरामरक्षा पठण स्पर्धेचे आयोजन रविवारी (ता. २२) सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत करण्यात आले आहे. ही स्पर्धा डोंबिवली येथील टिळकनगर विद्यामंदिर येथे पार पडणार असून स्पर्धेसाठी १०० रुपये (देणगी मूल्य) प्रवेश शुल्क निश्चित केले आहे. ही स्पर्धा सर्व वयोगटातील नागरिकांसाठी खुली असून ती पाच ते १० वर्षे, ११ ते १८ वर्षे आणि १८ वर्षांवरील सर्व (खुला गट) अशा तीन मुख्य गटांत विभागली गेली आहे.
प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला प्रशस्तिपत्र देऊन प्रोत्साहित केले जाईल. आजच्या धावपळीच्या युगात आपल्या संस्कृतीतील स्तोत्रे मुलांपर्यंत पोहोचावीत आणि त्यांना पाठांतराची गोडी लागावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवत आहोत. असे प्रकल्प प्रमुख प्रसाद रिसबूड यांनी म्हटले आहे. इच्छुक स्पर्धकांनी गुगल फॉर्मद्वारे नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. आजच्या पिढीपर्यंत आपल्या संस्कृतीतील स्तोत्रे पोहोचावीत आणि त्यांना पाठांतरासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती प्रकल्पप्रमुख प्रसाद रिसबूड यांनी दिली. नागरिकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

