रायगडचे प्रमोद म्हसकर यांचा ठाण्यात गौरव!

रायगडचे प्रमोद म्हसकर यांचा ठाण्यात गौरव!

Published on

रायगडचे प्रमोद म्हसकर यांचा ठाण्यात गौरव!
‘द ओमेगा लिगसी’ पुरस्काराने सन्मानित!
रोहा, ता. १८ (बातमीदार) ः आपल्या कर्तृत्वाने मुंबई ते दुबईपर्यंत व्यवसायाचा विस्तार करणारे प्रमोद अनंत म्हसकर यांना ठाण्यातील नामांकित द्रोणाचार्य शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने ‘द ओमेगा लिगसी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात झालेल्या या सोहळ्यात प्रमोद म्हसकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. प्रमोद म्हसकर यांनी केवळ व्यवसायच केला नाही, तर रायगड जिल्ह्यातील शेकडो युवा खेळाडूंना आर्थिक पाठबळ देऊन त्यांना ‘आधारस्तंभ’ म्हणून साथ दिली आहे. अनेक जखमी खेळाडूंच्या शस्त्रक्रियेचा खर्च उचलून त्यांनी आपली क्रीडा क्षेत्राबद्दलची आत्मीयता सिद्ध केली आहे. आरोग्य क्षेत्रातही दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च करून हजारो गरिबांच्या आयुष्यात त्यांनी आशेचा किरण निर्माण केला आहे. म्हसकर यांच्या या कार्याची दखल घेत द्रोणाचार्य शिक्षण प्रसारक संस्थेने त्यांचा विशेष सन्मान केला.
उपेक्षित समाज व शिक्षणापासून वंचित असलेल्या तळागाळातील ३००० मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे पवित्र कार्य द्रोणाचार्य शिक्षण प्रसारक संस्था गेली अनेक वर्षे अविरतपणे करत आहे. या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ मिळावे आणि त्यांच्यासमोर अनेक आदर्श व्यक्तिमत्त्व असावे, या मुख्य हेतूने संस्थेचे संस्थापक विनोद पाटील यांच्या संकल्पनेतून दरवर्षी या सोहळ्याचे आयोजन केले जाते. जिथे राज्यातील विशेष सामाजिक कार्यकर्त्यांचा आदर व सन्मान केला जातो.
रोहा तालुक्यातील पुगावचे सुपुत्र असलेल्या प्रमोद म्हसकर यांना पुरस्कार मिळाल्याची बातमी समजताच संपूर्ण रायगड जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

फोटो कॅप्शन : मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना प्रमोद म्हसकर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com