गॅस वितरणात अडचणी; मुंबई उपनगरात २४ तास आपत्कालीन कक्ष सुरू
गॅस वितरणात अडचणी; मुंबई उपनगरात २४ तास आपत्कालीन कक्ष सुरू
प्रशासनाचा तुटवडा नसल्याचा दावा; मात्र नागरिकांना सिलिंडर मिळण्यात विलंब
जोगेश्वरी, ता. १८ (बातमीदार)ः एलपीजी गॅसचा तुटवडा नसल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत असला, तरी मुंबई उपनगरातील काही भागांत गॅस सिलिंडर वितरणात अडचणी निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर उपनियंत्रक शिधावाटप ‘ड’ परिमंडळ कार्यालयाकडून २४ तास आपत्कालीन कक्ष सुरू करण्यात आला आहे.
बिलवा भवन, नेहरू रोड, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई येथे सुरू करण्यात आलेल्या या कक्षामार्फत नागरिकांना गॅस किंवा पेट्रोल वितरणासंदर्भातील तक्रारी नोंदविता येणार आहेत. त्यासाठी ९०८२७६३३८२ हा दूरध्वनी क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, तेल कंपन्या दरम्यान, जोगेश्वरी ते बांद्रा या उपनगरासाठी गॅस वितरण तक्रारींसाठी विभागनिहाय अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार, बांद्रा पश्चिम- किरण जामसंडेकर (९८९२६९७७१३), सांताक्रूझ- अरविंद ढवण (९८२०६५५१४९), विलेपार्ले - राकेश गावडे (९९६७४०९५९३), अंधेरी पश्चिम - याकुब सय्यद (९९६७४५९११९), अंधेरी पूर्व- सुनील काकडे (९९८७२३७९५४) आणि बांद्रा पूर्व- नितीन पवार (९९६७५२७७०५) यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.
नागरिकांनी घाबरून न जाता संयम बाळगावा, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. तसेच, कोणी गॅसचा काळाबाजार करत असल्यास किंवा जादा दराने विक्री करत असल्यास संबंधित कार्यालयात तक्रार करण्याचे आवाहन सांताक्रुज पूर्वच्या ड परिमंडळाचे उपनियंत्रक शिधावाटप अधिकारी भास्कर तायडे यांनी केले आहे. या परिस्थितीत प्रशासनाच्या दाव्यांपेक्षा प्रत्यक्षात वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

