अंबरनाथ मस्जिद ट्रस्टतर्फे इफ्तार पार्टी
अंबरनाथ, ता. १८ (वार्ताहर) : रमजान महिन्याचे औचित्य साधून अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट मुस्लिम जमातच्या वतीने इफ्तार पार्टी घेण्यात आली होती. अंबरनाथ पश्चिमेकडील हजरत गैबन शाह वली दर्गाह येथील ईदगाह मैदानावर पार पडलेल्या या कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांनी उपस्थिती लावली.
इफ्तार पार्टीला अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, उपनगराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील, नगरसेवक प्रदीप नाना पाटील, पवन वाळेकर, गटनेते रवींद्र करंजुले, नगरसेविका पूनम शेलार आणि आरपीआय (सेक्युलर) चे श्याम गायकवाड उपस्थित होते. याप्रसंगी मस्जिद ट्रस्टच्या वतीने सर्व पाहुण्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी मुस्लिम बांधवांशी संवाद साधून त्यांना पवित्र रमजान ईदच्या आगाऊ शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात मुस्लिम बांधवांनी सायंकाळी एकत्र इफ्तारी करून रोजा सोडला. या पार्टीसाठी अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट मुस्लिम जमातचे अध्यक्ष युसूफ कासम शेख, आरिफ काझी, चांद शेख, इम्रान शेख, मकबूल खान, बिस्मिल्ला शेख आणि नईम शेख यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी ॲड. मुझाहिद काझी, खालिद काझी, अब्दुल गनी पिरजादे, हबीब सौदागर, रम्मू काझी यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

