बंद दाराआड ‘स्थायी’मध्ये अंदाज पत्रकावर चर्चा

बंद दाराआड ‘स्थायी’मध्ये अंदाज पत्रकावर चर्चा

Published on

वाशी, ता. १८ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन समिती आणि स्थायी समितीचा अर्थसंकल्प बंद लिफाफ्यात ठेवण्यात आला आहे. आता सत्ताधाऱ्यांकडून स्थायी समितीच्या बैठकीत अर्थसंकल्पावर बंद दाराआड चर्चा करण्यात येत आहेत. परिवहन व स्थायी समितीच्या सदस्यांनी अभ्यासाच्या गोंडस नावावर अर्थसंकल्पाच्या गोपनीय बैठका घेत असल्याने पालिका वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेषकरून प्रशासक म्हणून पालिका आयुक्तांच्या प्रस्तावांना ब्रेक लावण्यात येण्याची शक्यता असून, सरकारकडून आलेल्या अधिकाऱ्यांना पुुन्हा शासन दरबारी पाठविण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी या गोपनीय बैठकांमध्ये व्यूहरचना आखल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

स्थायी समितीच्या बैठकीत विशेषकरून सदस्यांनी मांडलेल्या प्रस्तावांना अंतिम खर्चाच्या अनुषंगाने मंजुरी दिली जाते. पालिकेच्या स्थायी समितीने मागील आठवड्यात प्रशासनाकडून बंद लिफाफ्यात अर्थसंकल्प स्वीकारला. या वेळी सभापतींकडून मागील पाच वर्षांच्या प्रशासकीय राजवटीत झालेल्या शहरातील विकासकामांच्या अनुंषगाने आणि सदस्यांच्या सूचनांना अर्थसंकल्पात स्थान देण्यासाठी वेळ मागण्यात आली. त्यानंतर सोमवारी (ता. १६) स्थायी समितीच्या सदस्यांची बैठक पार पडली. या वेळी सदस्यांनी मांडलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली. मात्र, पालिकेच्या इतिहासात परिवहन आणि स्थायी समितीच्या बैठका या बंद दाराआड झाल्याचा प्रकार पहिल्यांदा घडला आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांवर या बैठकीत चर्चा झाली की, राजकीय गणिते सत्ताधारी आणि विरोधकांनी जुळवाजुळव केली? अशी शंका व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com