१९.३६ लाखांचा दंड वसूल

१९.३६ लाखांचा दंड वसूल

Published on

लोकअदालतीत मुलुंड वाहतूक विभागाचा १९.३६ लाखांचा दंड वसूल
मुलुंड, ता. १८ (बातमीदार) : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकडून प्रलंबित दंड वसूल करण्यासाठी मुलुंड वाहतूक पोलिस विभागातर्फे लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. मुलुंड पश्चिमेतील ई-सेवा केंद्र येथे शनिवारी (ता. १४) झालेल्या या लोकअदालतीत वाहनचालकांकडून तब्बल १९ लाख ३६ हजार रुपयांहून अधिक प्रलंबित दंड वसूल करण्यात आला. वाहतूक नियमांचे पालन केल्यास दंड भरण्याची वेळच येणार नाही, असे आवाहन मुलुंड वाहतूक विभागाने वाहनचालकांना केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com