किल्ले दुर्गाडीवर साजरा होणार चैत्र नवरात्रौत्सव

किल्ले दुर्गाडीवर साजरा होणार चैत्र नवरात्रौत्सव

Published on

किल्ले दुर्गाडीवर चैत्र नवरात्रोत्सवाचा उत्साह
शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील यांच्याकडून पूर्वतयारीची पाहणी
कल्याण, ता. १८ (वार्ताहर) : ऐतिहासिक वारसा असलेल्या किल्ले दुर्गाडीवर सालाबादप्रमाणे यंदाही चैत्र नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘किल्ले दुर्गाडी नवरात्रोत्सव समिती’चे अध्यक्ष तथा शिवसेना कल्याण शहरप्रमुख रवी पाटील यांनी किल्ल्यावरील नूतनीकरण कामांची प्रत्यक्ष पाहणी करून नियोजनाचा आढावा घेतला.

यंदाचा उत्सव १९ मार्च (गुढीपाडवा) ते २६ मार्च (रामनवमी) या कालावधीत होणार आहे. गुरुवारी (ता. १९) गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर उत्सवाला सुरुवात होईल. बुधवारी (ता. २५) सकाळी नवचंडी यज्ञपूर्णाहुती आणि सायंकाळी भव्य महाप्रसाद (भंडारा) होईल. गुरुवारी २६ मार्चला श्री रामप्रभूंना पुरुषसूक्त अभिषेक आणि श्रीराम जन्मोत्सव महाआरती होणार आहे.

रवी पाटील यांनी किल्ल्यावर सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. तसेच, उत्सवादरम्यान भाविकांची गर्दी लक्षात घेता सुरक्षितता आणि शिस्तीसाठी शिवसेना पदाधिकारी, सेवेकरी आणि कार्यकर्त्यांची विशेष बैठक पार पडली. या पाहणी दौऱ्यावेळी शिवसेना भिवंडी लोकसभा समन्वयक सुनील वायले, नगरसेवक रूपेश सकपाळ, रोहन कोट, माजी नगरसेवक विजय काटकर यांच्यासह बाजारपेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश गौड आणि ‘क’ प्रभाग सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात उपस्थित होते. तसेच महिला विभाग संघटक अक्षया दळवी, मनोहर व्यवहारे, प्रतीक चौधरी व इतर शिवसैनिक आणि सेवेकरी मोठ्या संख्येने हजर होते.

प्रशासकीय सूचना
उत्सवाच्या काळात गडावर येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याचे पाणी, प्रकाश व्यवस्था आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिका व पोलिस प्रशासनाशी समन्वय साधण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com