महिलांच्या कलेचा अनोखा संगम

महिलांच्या कलेचा अनोखा संगम

Published on

डोंबिवलीत ‘वूमेन्स आर्ट फेअर''चा कलाविष्कार
४० महिला कलाकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन

डोंबिवली, ता. १८ : सांस्कृतिक नगरीत महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि सामाजिक कार्याला हातभार लावण्यासाठी ‘वूमेन्स आर्ट फेअर - आर्ट फॉर चॅरिटी’ या अनोख्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून चित्रकला, शिल्पकला आणि हस्तकलेचा नयनरम्य संगम रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.

दीपकला फाउंडेशन आणि डोंबिवलीकर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. २० ते २२ मार्च या कालावधीत डोंबिवलीतील आनंद बालभवन येथे हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. गुढीपाडवा आणि महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित या प्रदर्शनात विविध क्षेत्रांतील सुमारे ४० महिला कलाकार सहभागी झाल्या आहेत. यामध्ये डॉक्टर, इंजिनिअर आणि आर्किटेक्ट अशा व्यावसायिक महिलांनी जोपासलेली कला पाहायला मिळेल. चित्रकला, शिल्पकला, रेझिन आर्ट, मंडला, मधुबनी, सिरेमिक, मोजेक आर्ट आणि पारंपारिक हस्तकला पाहायला मिळणार आहे.

सामाजिक कार्याला मदतीचा हात
दीपकला फाउंडेशन, डोंबिवलीकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जात आहे. प्रदर्शनात कलारसिकांकडून स्वेच्छेने जमा होणारी रक्कम दीपकला फाउंडेशनला देण्यात येईल, ज्याचा विनियोग उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com