पिसे ते टेमघर जलवाहिनीतून दिवसाला १२ कोटी लिटर पाण्याची चोरी
पिसे ते टेमघर जलवाहिनीतून १२ कोटी लिटर पाणीचोरी
उपमुख्यमंत्र्यांकडे पुरावे सादर करणार ः शानू पठाण यांचे विधान
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : पिसे धरणातून १२ कोटी लिटर पाण्याची दररोज चोरी होत असल्याचे विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी उघडकीस आणले आहे. आमणे पाडा ते सवाददरम्यान पाहणी करून ही पाणीचोरी त्यांनी समोर आणली. दरम्यान, या पाणीचोरीचे सर्व पुरावे आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर करणार असल्याचे शानू पठाण यांनी सांगितले.
गेल्या अनेक दिवसांपासून ठाण्यात पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. यामागे पाणीचोरी हे मुख्य कारण असल्याची माहिती शानू पठाण यांनी दिली. पठाण यांनी मंगळवारी (ता. १८) आमणेपाडा ते सवाददरम्यान नगरसेविका मर्जिया पठाण यांच्यासह पाहणी केली. यादरम्यान, अनेक ठिकाणी मुख्य जलवाहिनी व्हाॅल्ववर जोडण्या करून नजीकच्या गोदामांना बेकायदेशीरपणे पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचे निदर्शनास आले. या दोन जलवाहिन्यांमध्ये मातीचा रस्ता तयार करून टँकरमध्ये पाणी भरले जात असल्याचेही उघडकीस आले. यासंदर्भात शानू पठाण म्हणाले की, पिसे धरणामधून दररोज ३०० दशलक्ष लिटर पाणी ठाणे शहरासाठी उचलण्यात येत असते. हे पाणी टेमघर येथील शुद्धीकरण केंद्रात आणून पुढे ते ठाणे शहरात वितरित करण्यात येते. पिसे ते टेमघर हे १७ किलोमीटर अंतर असून, यादरम्यान जलवाहिनीवर दर शंभर मीटरवर अनेक व्हाॅल्व असून, या व्हाॅल्वला ४, ६, ८ इंचाची अनधिकृत जोडण्या करून त्याद्वारे पाणी चोरी करण्यात येत आहे. दिवसाला साधारणपणे १२ दशलक्ष लिटर पाणी चोरले जात आहे. ठाणेकरांच्या हक्काचे पाणी बेकायदेशीरपणे गोदामे, टँकरमाफिया चोरत असूनही अधिकारी डोळे मिटून शांत आहेत. त्यामागे कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार होत आहे. या पाणीचोरीचे सर्व पुरावे एकनाथ शिंदे यांना सादर करणार आहोत, असे शानू पठाण यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

