कॅडबरी जंक्शन येथे ट्राफिक सिग्नलचा एलईडी दिवा तुटून लटकला
सिग्नलचा एलईडी दिवा तुटून लटकला
कॅडबरी जंक्शन येथे दुर्घटनेची भीती; प्रशासनाने तत्काळ हटविला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : ठाण्यातील नाशिक-मुंबई रोडवरील कॅडबरी जंक्शन येथे ट्राफिक सिग्नलचा एलईडी दिवा तुटून लटकत असल्याची घटना बुधवारी (ता. १८) सकाळी समोर आली. या प्रकारात कोणतीही दुखापत झाली नाही. तत्काळ शासकीय यंत्रणांनी धाव घेत, तुटून लटकत असलेला एलईडी सिग्नल दिवा तत्काळ सुरक्षितरीत्या बाजूला केला.
ठाण्याच्या कॅडबरी पुलावळील सिग्नल परिसरात बुधवारी सकाळी सुमारे १०.४५ वाजण्याच्या सुमारास ट्राफिक सिग्नलचा एलईडी दिवा तुटून लटकला होता. या रस्त्यावर वाहतुकीची मोठी रहदारी असल्याने दुर्घटनेची भीती व्यक्त करण्यात येत होती. यासंबंधीची माहिती एका दक्ष नागरिक गणेश पारकर यांनी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. त्या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिस, ठाणे महापालिकेचा विद्युत विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाचे पथक तत्काळ घटनास्थळी धाव घेत, तुटून लटकत असलेला एलईडी सिग्नल दिवा तत्काळ सुरक्षितरीत्या बाजूला काढला. संबंधित यंत्रणांच्या समन्वयामुळे संभाव्य अपघात टळला. या वेळी हायड्रोलिक क्रेन, पिकअप व इमर्जन्सी वाहन पाचारण करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

