कांथी दत्त यांची ७३८ किमी सायकल मोहीम पूर्ण
कांथी दत्त यांची ७३८ किमी सायकल मोहीम पूर्ण
वाशीत उत्साहात समारोप
नवी मुंबई, ता. १८ (वार्ताहर) : उद्योजक व अल्ट्रा डिस्टन्स सायकलिस्ट कांथी दत्त यांनी हैदराबाद ते मुंबई अशी ७३८ किलोमीटरची सायकल मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली. या प्रवासात त्यांनी तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन राज्यांतून सात दिवस सायकल चालवत प्रवास केला. या मोहिमेचा समारोप मंगळवारी सकाळी वाशी येथील इनऑर्बिट मॉल येथे उत्साहात करण्यात आला.
लोकांमध्ये फिटनेसबाबत जागरूकता निर्माण व्हावी तसेच लोकांना सक्रिय व निरोगी जीवनशैलीकडे प्रेरित करण्याच्या उद्देशाने स्पोर्टस ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या सहकार्याने सायकल मोहीम घेण्यात आली होती. या मोहिमेतील ५०० किमीचा टप्पा पुणे येथे साजरा करण्यात आला. मंगळवारी वाशी येथील समारोप कार्यक्रमाला अभिनेता अभिषेक बजाज आणि क्रिकेटपटू अभिषेक कपूर हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी दोघांनीही कांथी दत्त यांच्या या पराक्रमाचे कौतुक करीत फिटनेस आणि खेळांमुळे जीवनात शिस्त व मानसिक ताकद वाढते, असे मत व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

